🕒 1 min read
क्रिकेट प्रतिनिधी | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण प्लेऑफमधील शेवटचं तिकीट या सामन्यावर अवलंबून आहे.
मुंबई इंडियन्स सध्या 12 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या स्थानी आहे, तर दिल्ली 13 गुणांसह पाचव्या स्थानावर. मुंबईने आजचा सामना जिंकला, तर ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. दुसरीकडे, दिल्लीला प्लेऑफसाठी दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे.
IPL 2025: Mumbai Indians vs Delhi Capitals
हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अॅक्युवेदरच्या अहवालानुसार सकाळपासून दुपारपर्यंत पावसाची शक्यता अधिक असून संध्याकाळी सामना सुरु होईपर्यंत ही शक्यता 7-8% पर्यंत कमी होईल. त्यामुळे सामना संध्याकाळी खेळला जाईल, अशी आशा आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अंतिम सामन्याआधी संघात मोठे बदल करत, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश आणि रायन रिकेलटन यांच्या जागी जॉनी बेअरस्टो, चारिथ असलंका आणि रिचर्ड ग्लीसन यांचा समावेश केला आहे.
तीन संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. चौथ्या आणि अंतिम स्थानासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये थरारक लढत होणार आहे. पावसाचा अडथळा येणार की मैदानात निर्णय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- छगन भुजबळ पुन्हा मंत्रिपदावर; सदावर्ते म्हणतात, “हे भटक्या-विमुक्तांचे सरकार”
- CSK आणि RR यांच्यातील अखेरचा साखळी सामना – कोण जिंकेल IPL 2025 चा सामना?
- ऋषभ पंतला स्वतःचं रोल माहित नाही! मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now