‘मुंबईत राहतो तर मराठी…’; हिटमॅन रोहित शर्माच्या ‘त्या’ एका वाक्याने जिंकलं महाराष्ट्राचं मन!

भारतीय कर्णधार रोहित शर्माने अस्खलित मराठी बोलत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘मुंबईत राहतो तर मराठी येणारच’, या त्याच्या वाक्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Published On: 

Rohit Sharma Marathi Video: 'मुंबईत राहतो तर...'

कॅप्टन कुल असो किंवा हिटमॅन, रोहित शर्माचा (Rohit Sharma) नादच खुळा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मैदानावर आपल्या बॅटिंगने गोलंदाजांची झोप उडवणारा रोहित आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. क्रिकेटच्या पीचवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या रोहितने यावेळी चक्क अस्खलित मराठी बोलून सर्वांनाच ‘क्लीन बोल्ड’ केलंय. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “भावा, एकच काळीज आहे, कितीदा जिंकणार?”

सध्या सोशल मीडियावर एक Viral Video धुमाकूळ घालतोय, ज्यामध्ये रोहित शर्मा चक्क मराठी कलाकारांच्या घोळक्यात गप्पा मारताना दिसतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांच्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या टीमची रोहितने नुकतीच भेट घेतली.

Rohit Sharma Marathi Video

एका रेस्टॉरंटमधील ही भेट होती. यावेळी नम्रताने रोहितला चक्क मराठीत प्रश्न विचारला आणि त्यावर रोहितने दिलेलं उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्यांचीच नव्हे, तर साऱ्या नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

नम्रता संभेरावने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती रोहितला विचारते, “कसे आहात तुम्ही?” यावर रोहित हसून “मी मजेत आहे,” असं उत्तर देतो. पुढे नम्रता म्हणते की, “तुम्ही बऱ्याचदा मराठीत बोलता, म्हणून मी तुमच्याशी मराठीत संवाद साधला.” यावर रोहितने जे उत्तर दिलं, ते खरंच कौतुकास्पद होतं. रोहित आपल्या खास मुंबईकर स्टाईलमध्ये म्हणाला, “काही नाही, समजते मला! मुंबईमध्ये राहतो तर मराठी तर येणारच!”

त्याचं हे वाक्य ऐकून तिथे उपस्थित असलेल्या कलाकारांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. रोहित मूळचा नागपूरचा असला तरी त्याचं सर्व क्रिकेट करीअर मुंबईतच घडलंय. मैदानावरील स्टम्प माईकमध्ये अनेकदा तो आपल्या टीममेट्सशी मराठीत बोलताना आढळला आहे, पण यावेळी त्याने ज्या सहजतेने संवाद साधला, त्याने चाहत्यांना वेड लावलंय. अभिनेत्री नम्रता संभेरावनेही कॅप्शनमध्ये रोहितच्या साधेपणाचं तोंडभरून कौतुक केलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही