Share

ऋषभ पंतला स्वतःचं रोल माहित नाही! मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला

Mohammad Kaif attacked Rishabh Pant for not knowing his own role in IPL 2025. He said Pant kept changing his batting position and lacked clarity as a captain.

Published On: 

Mohammad Kaif attacked Rishabh Pant for not knowing his own role in IPL 2025. He said Pant kept changing his batting position and lacked clarity as a captain.

🕒 1 min read

IPL 2025 | नवी दिल्ली: Lucknow Super Giants (LSG) कॅप्टन ऋषभ पंत याच्या कामगिरीवर आता माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनीही जोरदार टीका केली आहे. कैफ यांनी Star Sports वरील चर्चेत पंतच्या बॅटिंग ऑर्डरवरील गोंधळावर प्रश्न उपस्थित केले.

कैफ म्हणातो, “ऋषभ पंत एकदा नंबर 3 ला येतो, तर कधी 5 वा 6 वर. एक कर्णधार म्हणून त्याने पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत स्वतःचा क्रमांक ठरवायला हवा होता. मगच संघ त्यानुसार बांधता आला असता.”

Mohammad Kaif Slams Rishabh Pant

त्यांनी स्पष्ट सांगितलं की पंत काही वेळा संघासाठी गरजेच्या वेळी बॅटिंगलाच आला नाही. “कधी त्याचं लक्ष फक्त कॅप्टन्सीवर असतं, तर कधी विकेटकीपिंगवर, त्याला स्वतःचं रोलच समजलेलं नाही असं वाटतं.

पंतने IPL 2025 मध्ये 12 सामन्यांत केवळ 135 धावा केल्या असून त्याचा सरासरी फक्त 12.27 इतकी आहे. त्याने केवळ एकच अर्धशतक झळकावले आणि अनेक सामन्यांमध्ये बॅटिंग क्रमांक बदलत राहिला. LSG च्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभवानंतर पंतने स्पष्ट केलं की संघाला अपेक्षित गोलंदाज मिळाले नाहीत. “आम्ही जसा स्क्वॉड प्लॅन केला होता, तसेच बॉलर्स राहिले असते तर वेगळं चित्र दिसलं असतं,” असं त्याने सांगितलं. मात्र पंतने दिग्वेश राठी याच्या कामगिरीचे कौतुक केलं.

अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी पंतवर टीका करत त्याला काही काळ खेळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सर्वात महागडा खेळाडू ठरूनही त्याने यंदा एकही सामन्यात निर्णायक खेळी केली नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

India Cricket IPL 2025 Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या