Share

‘किंग’ कोहलीने अचानक घेतली माघार; दिल्लीच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार नाही, कारण काय?

Virat Kohli to miss Delhi vs Railways clash in Vijay Hazare Trophy; likely to join Team India for New Zealand ODI series.

Published On: 

Virat Kohli to miss Delhi vs Railways clash in Vijay Hazare Trophy; likely to join Team India for New Zealand ODI series.

दिल्ली – ‘किंग’ कोहलीची (Virat Kohli) फलंदाजी घरच्या मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. दिल्लीच्या जर्सीत विराट पुन्हा धावांचा पाऊस पाडेल, अशी आशा सर्वांना होती, पण ऐनवेळी विराटने विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) च्या महत्त्वाच्या सामन्यातून माघार घेतल्याने क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

येत्या मंगळवारी, ६ जानेवारीला अलर (Alur) येथील केएससीए मैदानावर दिल्ली विरुद्ध रेल्वे (Delhi vs Railways) हा सामना रंगणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार, असा दावा खुद्द दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) अध्यक्ष रोहन जेटली यांनी केला होता. मात्र, ताज्या अपडेटनुसार, विराटने या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.

Virat Kohli to miss Delhi vs Railways

येत्या ११ जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ एकत्र येणार आहे. त्यामुळेच, सराव आणि विश्रांतीसाठी विराटने दिल्लीच्या सामन्यातून माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) सुद्धा भारतीय संघात आहे, पण तो हा सामना खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार, करारातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये किमान दोन सामने खेळणे बंधनकारक आहे. विराटने या स्पर्धेत आधीच दोन सामने खेळून एक शतक आणि एक अर्धशतक (७७ धावा) झळकावले आहे. त्यामुळे त्याचा कोटा पूर्ण झालाय, तर पंत आपला सराव कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरू शकतो.

विराटने घरच्या मैदानावर जो जलवा दाखवला होता, तो आता थेट ‘मेन इन ब्लू’च्या जर्सीत न्यूझीलंडविरुद्ध पहायला मिळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार असल्याने आता सर्वांचे लक्ष या मालिकेकडे लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही