Share

छगन भुजबळ पुन्हा मंत्रिपदावर; सदावर्ते म्हणतात, “हे भटक्या-विमुक्तांचे सरकार”

After being upset for not getting a ministerial post, Chhagan Bhujbal finally took oath as minister. Advocate Gunaratna Sadavarte reacted.

Published On: 

Advocate Gunratna Sadavarte accused Manoj Jarange of harming Maratha students by losing their EWS quota. | Chhagan Bhujbal

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भुजबळांनी आज शपथ घेतली.

छगन भुजबळांच्या मंत्रिपदावर नियुक्ती झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भुजबळ पुन्हा पदावर आल्याने वाडी-तांडा, प्रभू श्रीराम आणि भगवान बाबांचे श्रद्धास्थान मानणाऱ्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भुजबळ मंत्री झाल्यामुळे जनतेला समजलं आहे की, हे सरकार भटक्या विमुक्तांचं आहे,” असं त्यांनी म्हटलं.

Chhagan Bhujbal Becomes Minister Again

याचवेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. “कायद्याची पायमल्ली करू नका, भटक्या-विमुक्तांना छेडू नका, ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यावर चुकीचं बोलण्याची हिंमत करू नका,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही छगन भुजबळांचं स्वागत केलं. “आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, भुजबळांना आज न्याय मिळाला आहे. त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्राला होईल,” असं त्यांनी सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही