Share

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने तोडले सर्व विक्रम; सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ICC स्पर्धांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

The ICC Champions Trophy 2025 recorded a historic 368 billion global viewing minutes, with India vs New Zealand final becoming the most-watched match in tournament history. Massive digital and global viewership growth reported.

Published On: 

ICC Champions Trophy 2025 breaks all records; ranks third among most watched ICC tournaments

🕒 1 min read

ICC (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) ने नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) च्या ब्रॉडकास्टबाबतचा अहवाल जाहीर केला असून, या स्पर्धेने अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पाकिस्तान आणि यूएईमध्ये पार पडलेल्या या बहुचर्चित स्पर्धेने 368 अब्ज ग्लोबल व्ह्यूअिंग मिनिट्स नोंदवत आतापर्यंतची सर्वात जास्त पाहिली गेलेली ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ठरली आहे. यामध्ये 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या आवृत्तीच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दुबईमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. 9 मार्च रोजी खेळलेला हा सामना एकट्याने 65.3 अब्ज व्ह्यूअिंग मिनिट्स मिळवत ICC च्या इतिहासातला सर्वाधिक पाहिला गेलेला चॅम्पियन्स ट्रॉफी सामना ठरला.

भारतासाठी हा सामना केवळ विजयी ठरला नाही तर ICC च्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सामने यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी फक्त ICC वर्ल्ड कप 2023 मधील भारत-न्यूझीलंड सेमीफायनल आणि भारत-ऑस्ट्रेलिया फायनलने अधिक पाहणं मिळवलं होतं.

ICC Champions Trophy 2025 breaks all records; ranks third among most watched ICC tournaments

भारतामध्ये ही स्पर्धा 29 वेगवेगळ्या चॅनेल्सवर, 9 भाषांमध्ये प्रसारित झाली. यामध्ये इंडियन साइन लँग्वेज फीड, ऑडिओ डेस्क्रिप्टिव्ह कमेंट्री यासारख्या समावेशक सुविधा देण्यात आल्या होत्या. MaxView मोबाईल फीड मुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही स्पर्धा सर्वाधिक पाहिली गेली.

ऑस्ट्रेलियातसुद्धा ही स्पर्धा सर्वाधिक पाहिली गेलेली चॅम्पियन्स ट्रॉफी ठरली असून 2017 च्या तुलनेत 65% वाढ झाली आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने येथे ICC इव्हेंट्सच्या इतिहासातील सर्वोच्च प्रेक्षकसंख्या मिळवली.

अमेरिकेमध्ये सुद्धा वेळेची अडचण असतानाही 2017 च्या तुलनेत 38% वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये देखील, संघ जिंकू न शकल्यानंतरही 2017 च्या तुलनेत 24% अधिक व्ह्यूअिंग नोंदवली गेली.

ICC चे चेअरमन जय शाह म्हणाले, “ही आकडेवारी क्रिकेटचा जागतिक पातळीवर वाढणारा प्रभाव दर्शवते. भारतातील JioStar नेटवर्कच्या नवकल्पनांमुळे आणि बहुभाषिक कव्हरेजमुळे नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात मदत झाली.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

India Cricket IPL 2025 Maharashtra Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या