Champions Trophy । आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) स्पर्धेमधील अंतिम सामना उद्या भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पार पडणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, त्यामुळं या दोन संघांपैकी कोणता संघ विजेता होणार? याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (Champions Trophy Final)
या सामन्यात (Champions Trophy 2025) दोन्ही संघांवर दबाव असेल. पण या सामन्यांवर पावसाचे संकट कायम आहे. त्यामुळे अंतिम सामन्यांवरही पावसाचा प्रभाव पडला तर काय होईल? असा सवाल क्रिकेटप्रेमींना पडला आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
यावेळी आयसीसीने (ICC) अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. समजा हा सामना 9 मार्च रोजी पूर्ण झाला नाही तर तो 10 मार्च रोजी खेळवला जाईल. पण नियोजित तारखेला खेळ पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.
जर हे शक्य झाले नाही तर राखीव दिवशी सामना जिथं थांबवला होता तिथून सामन्याला सुरुवात होईल. जर अंतिम सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीचा झाला तर विजयी संघाचा निर्णय सुपर षटकांतून घेतला जाणार आहे. सुपर षटकाच्या नियमानुसार दोन्ही संघांना एक षटक खेळता येईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यात 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल झाली होती. त्यावेळी दोन्ही दिवशी सामना खेळवता आला नाही. त्यानंतर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले. जर यावेळी देखील पाऊस पडला तर यावेळीही असेच काहीसे घडण्याची शक्यता आहे.
ICC Champions Trophy 2025 Match Where To Watch On TV?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वर होणार आहे.
ICC Champions Trophy 2025 Match Live Streaming Details
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने लाईव्ह स्ट्रीमिंग जिओस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
Team India for Champions Trophy 2025
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
Team New Zealand for Champions Trophy 2025
मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.
महत्त्वाच्या बातम्या :