Nana Patekar । ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेताना दिसतात. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तडजोड करून मी कोणतंही काम केलं तर, कलाकार म्हणून मी संपेन असे ते सतत सांगत असतात.
अशातच आता त्यांना सात वर्षांपासून सुरु असलेल्या खटल्यात कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताकडून (Tanushree Dutta) 2018 मध्ये MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते.
हॉर्न ओके प्लीज या सिनेमाचे शुटिंग सुरु असताना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा तनुश्री दत्ताने केला होता. यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. अखेर यावर कोर्टाने निर्णय दिला आहे.
नाना पाटेकर यांच्याविरोधातील बी समरी रिपोर्ट दंडाधिकारी न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला आहे. लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
Nana Patekar me too case court hearing in court
कोर्टाच्या निर्णयामुळे तनुश्री दत्ताला मोठा धक्का बसला आहे. पण तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांच्याकडून मात्र तनुश्री दत्ताची याचिका कोर्टाने रद्द केली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला की नाही? असा सवाल निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :