🕒 1 min read
सातारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांची दरे (ता. जावळी) गावात भेट झाली. यावेळी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या नाना पाटेकर यांनी शिंदे यांच्या शेतात अननसाचे झाड लावले.
या भेटीदरम्यान नाना पाटेकर यांनी शिंदे यांचे प्रामाणिक राजकारण, त्यांच्यावर कोणताही ठपका नसलेला स्वच्छ सार्वजनिक जीवन आणि जुनी मैत्री याबाबत विशेष कौतुक केले. “मी त्यांना बाळासाहेबांच्या काळापासून ओळखतो, आमची मैत्री जुनी आहे. पण मी त्यांच्याकडे कधी काही मागितलेलं नाही,” असं वक्तव्य पाटेकर यांनी केलं.
Nana Patekar Praises Eknath Shinde: “Old Friends, Never Asked Him for Anything”
पाटेकर पुढे म्हणाले, “राजकारणात काही लोकांवर प्रश्नचिन्हं असतात, पण एकनाथ शिंदे यांच्यावर कधीच बोट ठेवता आलं नाही. मुख्यमंत्री असतानाही त्यांचं वर्तन निष्कलंक आहे.” त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कामगिरीचंही कौतुक केलं, मात्र शिंदेंच्या स्वच्छ प्रतिमेवर विशेष भर दिला. एकनाथ शिंदे यांच्या शेतात फळांचे विविध प्रकार पाहून नाना पाटेकर प्रभावित झाले. त्यांनी चिकू, स्ट्रॉबेरी, फणस यांचा आस्वाद घेतला.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांचे स्वप्न मुख्यमंत्रीपदाचेच; सुनील तटकरे म्हणाले, पुढची शपथ ही….!
- ‘लबाडांनो पाणी द्या!’ मोर्चात आदित्य ठाकरे उतरणार; पाणीटंचाई विरोधात एल्गार
- ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी खात्याचा निधी वळवला; शिरसाटांचा अजित पवारांवर संतप्त आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now