🕒 1 min read
मुंबई : “गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण योग जुळत नाही,” असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी नुकत्याच झालेल्या मुंबईतील कार्यक्रमात केलं. त्यांच्या या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य करत अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना तटकरे म्हणाले, “अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा शपथ घेतली आहे. मात्र पुढची शपथ मुख्यमंत्री म्हणून घेणे हे आमचं स्वप्न आहे.” यासाठी पक्षबांधणीची गरज असल्याचं ते म्हणाले. “हे स्वप्न साकार करायचं असेल, तर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Ajit Pawar Should Take Next Oath as Chief Minister, Says Sunil Tatkare
तटकरे यांनी अजित पवार यांची स्तुत्ती करत सांगितलं की, त्यांनी राज्याचा समतोल विकास केला असून, सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत. “लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांना वाटलं की अजित पवार संपले, पण आम्हाला विश्वास होता,” असंही त्यांनी सांगितलं.
तटकरे म्हणाले की, “फडणवीस आणि शिंदे यांच्याशी चांगलं समन्वयाने काम चाललं आहे. पण एकत्र येऊन अजून ताकद निर्माण करूया आणि सरकार अधिक प्रभावीपणे चालवूया.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘लबाडांनो पाणी द्या!’ मोर्चात आदित्य ठाकरे उतरणार; पाणीटंचाई विरोधात एल्गार
- ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी खात्याचा निधी वळवला; शिरसाटांचा अजित पवारांवर संतप्त आरोप
- “मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण…” – अजितदादांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत