🕒 1 min read
मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, कोणतीही पुर्वसूचना न देता सामाजिक न्याय विभागाच्या निधीतील सुमारे ४०० कोटी रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवण्यात आले. या आधी देखील या योजनेसाठी त्यांच्या खात्यातील ३,००० कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याचं त्यांनी उघड केलं.
शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार, हा निधी सामाजिक न्याय विभागासाठी महत्त्वाचा असून, असा निधी वळवणं म्हणजे अन्यायकारक निर्णय आहे. “माझ्या खात्याचे पैसे दुसऱ्या योजनेसाठी वापरणे म्हणजे कायदेशीरदृष्ट्या चुकीचं असून, अर्थखात्याची ही मनमानी मी सहन करणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Sanjay Shirsat Accuses Ajit Pawar of Diverting ₹400 Cr from Social Justice Dept for Ladki Bahin Scheme
या आरोपांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ‘माविआ’ सरकार असताना निधी न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या शिवसेना आमदारांना आता महायुती सरकारमध्येही तशाच समस्यांना सामोरे जावं लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिरसाट यांनी पुढे म्हटले की, “जर सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल, तर ते बंद करून टाका. निधी वर्ग करताना कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर मुख्यमंत्री यांच्याशी बोलून मी योग्य तो निर्णय घेईन.”
ते म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेसाठी निधी देणं गरजेचं आहे, पण त्यासाठी जातीआधारित वर्तन योग्य नाही. दलित बहिणींना मदत करायचीच असेल, तर त्यासाठी स्वतंत्र तरतूद असावी.”
📌 महत्वाच्या बातम्या
- “मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण…” – अजितदादांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
- मराठी लघुपट ‘सुलतान’चा फ्रान्समध्ये सन्मान; टूलूज महोत्सवात प्रेक्षक पुरस्कार पटकावला
- शुबमन गिलचा पंचांशी वाद, रिव्ह्यूवरून गोंधळ; अभिषेक शर्मा म्हणाला शांत हो..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now