Google Pixel । गुगलने (Google) काही दिवसांपूर्वी आपला Google Pixel 8a हा स्मार्टफोन लाँच केला होता. जो आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. कारण या फोनवर सध्या एक शानदार ऑफर (Google Pixel 8a Offer) सुरु आहे.
कंपनीचा हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून (Google Pixel 8a offer on Flipcart) सहज स्वस्तात खरेदी करू शकता. 52,999 रुपयांचा फोन (Google Pixel 8a Price) आता तुम्ही 15,000 रुपयांच्या ऑफरसह तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. इतकेच नाही तर या फोनवर 3,000 रुपये बँक ऑफर देखील मिळत आहे. आपल्याकडे एचडीएफसी बँक कार्ड असेल तर आपण या बँक ऑफरचा लाभ घेऊ शकता. म्हणजेच फोनची किंमत 34,999 रुपये असेल.
Exchange offer on Google Pixel 8a
त्याशिवाय तुम्ही गुगलच्या या फोनवर एक्सचेंज ऑफर मिळवू शकता. 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनवर 36,950 रुपयांची ऑफर मिळत आहे. जर तुम्ही या ऑफरचा फायदा घेतला तर फोनची किंमत आणखी कमी होईल. हे लक्षात ठेवा की जुन्या फोनचे मूल्य त्याच्या स्थिती आणि मॉडेलच्या आधारे एक्सचेंज ऑफर मिळेल.
Google Pixel 8a Features
कंपनीच्या Google Pixel 8a या फोनमध्ये तुम्हाला अॅल्युमिनियम फ्रेमसह प्लास्टिकचा बॅक पॅनेल पाहायला मिळेल. यात तुम्हाला 6.1 इंचाचा OLED पॅनेल असलेला डिस्प्ले देखील मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे.
त्याशिवाय हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर चालतो. प्रीमियम फोनमध्ये गुगल टेन्सर जी3 दिले असून तुमच्यासाठी 8 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून ज्यात 64 + 13 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13 मेगापिक्सेल कॅमेरा देखील मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले