Share

“जरांगे पाटील दोन जातीत भांडण…”; Laxman Hake यांचा गंभीर आरोप

Laxman Hake has made serious allegations based on the video shown by Manoj Jarange Patil. This has once again led to a clash between Jarange Patil and Hake.

by MHD

Published On: 

Laxman Hake Criticizing Manoj Jarange Patil

Laxman Hake । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके सतत एकमेकांवर निशाणा साधत असतात. यामुळे अनेकदा मोठे वाद निर्माण होतात. अशातच आता पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.

जरांगे पाटील यांनी एक व्यक्ती नंदी बैलाच्या मूर्तीची विटंबना करत असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावर हाकेंनी निशाणा साधला. “एका धनगर तरुणाला जालना येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मी पोलिसांना भेटलो. जरांगे पाटील कोणत्याही कारणावरून राज्यात दोन जातीत भांडण लावण्याचे काम करत आहेत,” असा आरोप हाके यांनी केला आहे.

“जरांगे यांच्याकडून बोराडेचा दारू प्यायल्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. पण तो महादेव भक्त आहे. जवळ मंदिर आहे, महाशिवरात्रीला तो तिकडे गेला होता. त्याने कोणतेही समाज विघातक कृत्य केले नाही,” असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

“बोराडे अर्धवट कपड्यात गेला असा आरोप जरांगे करत आहेत. पण बोराडे अश्लील हावभाव केले म्हणून मारणार का? मंदिरातील पुजारी आणि कुंभमेळामधील साधू काय पूर्ण कपड्यात असतात का?,” असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

Laxman Hake on Devendra Fadnavis

“कैलास बोराडे (Kailas Borade) यांना न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधातही रस्त्यावर उतरू. जरांगे यांची गृहखात्यामार्फत चौकशी व्हावी,” अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही