Datta Gade । पुण्यातील स्वारगेट डेपोमधील बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार (Pune Rape Case) करणाऱ्या दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला कोर्टाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत.
चौकशीदरम्यान दत्ता गाडे याच्याबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नुकताच त्याचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर आला होता, यामुळे मोठी खळबळ उडाली होती, अशातच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. (Pune Swargate Case)
पुणे पोलीस हे दत्ता गाडे याला घेऊन गुनाट गावात गेले आहेत. दत्ता गाडे याच्या फोनचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. दत्ता गाडे ज्या शेतात गेला होता, त्या ठिकाणी पोलिसांची 20 जणांची टीम शोध घेत आहेत.
दत्ता गाडे याच्या फोनमधून अनेक महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे आता पोलिसांच्या हाती दत्ता गाडेचा फोन लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच गाडेच्या फोनमधून कोणती माहिती समोर येणार? हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरते.
Pune police action mode on Pune Rape Case
दरम्यान, पुणे अत्याचार प्रकरणी सातत्याने नवनवीन खुलासे समोर येत आहे. पोलिसदेखील याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अशातच आता पोलिसांना दत्ता गाडे याचा फोन सापडला तर या प्रकरणाला नवीन वळण लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :