Share

“मराठा आरक्षणासाठी Chhagan Bhujbal जन्मापासूनच आडवे..”; मराठा नेत्याची आक्रमक भूमिका

Chhagan Bhujbal has been criticized for opposing Maratha reservation since his birth. This could create a new controversy.

by MHD

Published On: 

Manoj Jarange Patil criticized Chhagan Bhujbal

🕒 1 min read

Chhagan Bhujbal । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे दिग्गज नेते अडचणीत येत आहेत. नुकताच आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिला आहे. अशातच आता छगन भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“OBC धरतीवर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी SCBC लागू करा. मुलींना मोफत शिक्षण लागू करा. छगन भुजबळ जातीय विष पेरुन अजित पवार यांना अडचणीत आणत आहेत. ते जन्मल्यापासून मराठा आरक्षणासाठी आडवे येत आहेत,” अशी बोचरी टीका मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे.

“महान व्यक्ती (छगन भुजबळ) संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी काही बोलले नाहीत. तुमचे वय काय झालं? तुम्ही बोलता काय? कोणतेही कागद घेऊन इवळतो,” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, “मराठा समाजाला दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावा.आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. शिंदे समितीला मुदतवाढ दिली असून समिती काम करत नाही, समाजाला फसवू नका,” असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil on Maratha reservation

“मराठा समाजाच्या आमदारांना सांगतो, तुम्हाला समाजाने मते दिली आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha reservation) विषय लावून धरा. मराठ्यांच्या मतांचा आदर राखा. प्रश्न मांडला नाही तर गावा-गावामध्ये परिणाम दिसेल,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)