Share

Santosh Deshmukh हत्येचा धक्कादायक तपशील, काळीज पिळवटून टाकणारे मारहाणीचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो उघड

Santosh Deshmukh received tip three days before murder

बीड । जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा ( Santosh Deshmukh Murder Case ) एक नवा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो महेश केदारच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. SIT च्या पथकाने या सर्व धक्कादायक घटनांचा तपशील आरोपपत्रात नमूद केला आहे. ( videos reveal the inhumane treatment meted out to Santosh Deshmukh )

या व्हिडिओंमध्ये संतोष देशमुख यांच्यावर अत्यंत निर्दयीपणे मारहाण होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांचे कपडे काढून, केस धरून त्यांना अमानुष छळण्यात आले. “मला मारू नका” अशी विनवणी करीत असतानाही आरोपी देशमुख यांना मारत होते. 6 नोव्हेंबर 2025 रोजी आवादा कंपनीत झालेल्या घटनेची आठवण करून देत त्यांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली. आरोपींनी तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या दोन पाईपने त्यांना बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर जबरदस्तीने त्यांच्या तोंडून “सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे” असे वदवून घेतले.

Santosh Deshmukh Murder व्हिडिओंचा क्रमवार तपशील

महेश केदार याने या क्रूर अत्याचाराची संपूर्ण नोंद आपल्या मोबाईलमध्ये केली. 3:45 वाजता पहिला व्हिडिओ (1 मिनिट 10 सेकंद) काढला. त्यानंतर 3:47 वाजता (53 सेकंद), 3:48 वाजता (35 सेकंद), आणि 3:50 वाजता एक फोटो घेतला. 3:52 वाजता 2.4 सेकंद, 3:53 वाजता 7 सेकंद, 3:54 वाजता 36 सेकंद, 3:55 वाजता 14 सेकंद, आणि 3:58 वाजता 2 सेकंदांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले. 3:59 वाजता 5 आणि 12 सेकंदांचे व्हिडिओ काढले. तसेच, 5:34 वाजता 1 मिनिट 44 सेकंद, 5:35 वाजता 1 मिनिट आणि 5:53 वाजता 24 सेकंदांचा व्हिडिओ शूट करण्यात आला. ( Sudarshan Ghule brutally assaulted Deshmukh, and the horrifying act was captured in 15 videos and 8 photos found on the mobile phone of accused Mahesh Kedar. )

Shocking Revelation of 15 Videos and 8 Photos of Brutal Beating

संतोष देशमुख ( Santosh Deshmukh, the Sarpanch of Massajog village in Beed district ) यांच्या हत्येचे काही फोटो बाहेर आल्यानंतर आरोपींच्या विकृतीपूर्ण मानसिकतेचा अंदाज आला. आरोपींनी केवळ हत्या केली नाही तर त्या क्रौर्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यातून विकृत आनंद घेतल्याचे दिसून येते. SIT पथकाने या सर्व पुराव्यांचा समावेश करून दोषारोपपत्र तयार केले आहे. ही घटना समाजाला हादरवणारी असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह अनेकांकडून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

संतोष देशमुखांच्या मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा आणखी व्हिडीओ समोर आले आहेत, Santosh Deshmukh कळवळत असतानाही आरोपी मारत राहिले. Santosh Deshmukh Murder: Shocking Revelation of 15 Videos and 8 Photos of Brutal Beating

Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now