Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) लवकरच चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होईल. हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याची गॅंग सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे.
आज सकाळीच वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला गित्ते गॅंगकडून मारहाण करण्यात आली. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात एक वेगळीच शंका व्यक्त केली आहे.
संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेचा मृतदेह 27 मार्चला द्वारका नगरी वसाहतीत तिच्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. तिच्या मृत्यूबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. अंजली दमानिया यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
Anjali Damania post on X
अंजली दमानिया X वर लिहितात, “गुंड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतय,” असे दमानिया म्हणाल्या.
“या महिलेची ७ ते ८ दिवसापुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कुठल्या कारणाने हत्या झाली अन बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे,” असेही दमनीयांनी स्पष्ट केले.
“या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोष्टमार्टम केले व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत,” असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.
“ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची : मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे (कळंब), मनीषा मनोज बियाणी (कळंब), मनीषा राम उपाडे (अंबाजोगाई) आणि मनीषा संजय गोंदवले (रत्नागिरी),” असा दावा दमानिया यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :