Share

“घरगुती हिंसाचाराचं समर्थन?” वकील दुशींगची सनद रद्द करा! अंजली दमानिया आक्रमक

In the Vaishnavi Hagavane dowry death case, activist Anjali Damania lashes out at lawyer Vipul Dushing for his controversial courtroom arguments and demands his disbarment.

Published On: 

Anjali Damania reveals another case from Beed

मुंबई – वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने ( Vaishnavi Hagavane suicide ) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या हगवणे कुटुंबाच्या वतीने वकील विपुल दुशींग यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानांवर समाज माध्यमातून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

विपुल दुशींग यांनी न्यायालयात वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय उपस्थित करत, ती एका दुसऱ्या व्यक्तीशी चॅट करत होती, असा दावा केला. तसेच तिचा स्वभाव आत्महत्येचा होता, असा युक्तिवाद करून तिने पूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं.

Anjali Damania Slams Lawyer Vipul Dushi

या विधानांवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania ) यांनी संताप व्यक्त केला आहे. “प्लास्टिकच्या छडीने मारणं म्हणजे हत्यार नाही का?” असा प्रश्न उपस्थित करत, “तुम्ही घरगुती हिंसाचाराचं समर्थन करता का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

त्यांनी पुणे बार असोशिएशनला आवाहन करत म्हटलं की, “वकील दुशींग यांची सनद रद्द करण्यासाठी तात्काळ कारवाई केली जावी.” याशिवाय, त्यांनी विपुल दुशींग यांचा भूतकाळ उघड करत म्हटलं की, “एका जिल्हापरिषदेच्या शाळेतील 39 मुलींच्या विनयभंगाच्या प्रकरणात आरोपीला वाचवणारा हा तोच वकील आहे.” या सर्व प्रकारांमुळे वैष्णवी हगवणे प्रकरण अधिक गाजत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही