Walmik Karad । मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) वाल्मिक कराड आणि त्याची गॅंग बीडच्या कारागृहात आहे. अशातच आता त्याच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड याच्यासह सुदर्शन घुलेवर (Sudarshan Ghule) गित्ते गँगकडून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी बीडच्या कारागृहात दोन गटामध्ये तुफान राडा झाला. एका गटाने सुदर्शन घुले याला मारहाण केली.
कराडलादेखील कानाखाली लगावल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार परळीतील महादेव गित्ते (Mahadev Gitte) आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाली आहे. या मारहाणीत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. असून कारागृहात असणारी सुरक्षाव्यवस्था जास्त कडेकोट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वीही देखील कारागृहात अशा प्रकारच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत.
Walmik Karad, Sudarshan Ghule were beaten up in Beed jail
त्यामुळे पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपासून जेलमधील VIP ट्रीटमेंट चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच आता हा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले