Sanjay Raut । ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि संघावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका असून त्यानुसार संघाला हवी असणारी व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका स्पष्टपणे दिसत आहे,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “इतक्या वर्षात गेले नाहीत. नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींचीच भूमिका असते. ज्यावेळी हे तुम्ही समजून घेता, त्यावेळी मोदींना संघ कार्यालयात का जावे लागले हे स्पष्ट आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
तसेच संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. “देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चांगलं काम केलं तर पाठिंबा देऊ असं राज ठाकरे म्हणाले. तर ठाकरेंनी काल चांगल्या कामाची यादी जाहीर करायला पाहिजे होती. कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला, हे चांगले काम आहे का?,” असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
Sanjay Raut target Narendra Modi, Raj Thackeray and RSS
दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना नरेंद्र मोदी, संघ आणि राज ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. यावर आता त्यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :