Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. देशमुखांना न्याय मिळण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने काढण्यात आली.
या हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) चर्चेतले एक नाव म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यापासून सातत्याने त्याचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. अशातच आता त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड फिल्म प्रोडूसर होता, असा धक्कादायक दावा बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. तसेच त्यांनी याबाबत काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
यामध्ये बीकेसीमधील प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो आणि आयकार्डचा फोटो व्हायरल केला आहे. यामध्ये इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा कराड अजीवन सभासद असल्याचे समोर आले आहे. तसेच बीआरजे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था आहे.
Ranjit Kasle Reveals Shocking information about Walmik Karad
दरम्यान, रणजीत कासले यांनी वाल्मिक कराड बाबत केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कराड खरोखरच फिल्म प्रोडूसर होता का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे कराडचा सिने-इंडस्ट्रीशी संबंध होता का? याचा तपास पोलीस करतील.
महत्त्वाच्या बातम्या :