Karuna Munde । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या कारागृहात आहे. देशमुख हत्याप्रकरणात मनोज जरांगे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात (Maratha reservation) कार्यरत असणाऱ्या संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर अनेकदा यासंदर्भात टीका केली आहे. याबाबत करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी संगीता वानखेडे यांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत संगीता वानखेडे यांचा समाचार घेतला आहे.
Karuna Munde criticized Sangeeta Wankhede
“संगीता वानखेडे नावाची बाई सर्वांबद्दल खूप घाण घाण बोलत आहे. मी तिची सर्व माहिती काढली. ही महिला मला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये भेटली होती. त्यानंतर ती माझ्या नवऱ्याबद्दल खूप घाण घाण बोलली होती. पण आता मात्र तिला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासाठी अतिशय सहानुभूती का वाटत आहे?”, असा सवाल करुणा मुंडे यांनी केला आहे.
“मी तिची कुंडली काढली. ही जी महिला आहे ती खंडणीखोर वाल्मिक कराड गॅंग ची हि पार्टनर आहे. ती देखील खंडणीखोर आहे. तिच्यावर देखील खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. या महिलेच्या दोन मुली वाल्मिक कराडच्या कलाकेंद्रात नाचत आहेत. पैसे घेऊन ही महिला सगळ्यांवर घाणेरड्या कमेंट्स करत आहे”, असंही करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :