Devendra Fadanvis | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी अंत झाला. प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे यांच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्यानं या महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णालयावर करण्यात येत आहे.
Devendra Fadanvis Reaction On Tanisha Bhise Death Case
या घटनेनंतर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात असून माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असल्याचं बोललं जातंय. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, “किमान धर्मादाय रुग्णालयांनी तरी आपली भूमिका योग्य पद्धतीनं निभावली पाहिजे, अशा प्रकारची आपल्या सर्वांची अपेक्षा आहे.”
ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असवेंदनशिलतेचा परिचय या घटनेतून आपल्याला पाहायला मिळतो. या संदर्भात एक हाय लेव्हल कमिटी तयार केलेली आहे. जी या घटनेचा तर तपास करेलच त्यासोबतच अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, म्हणून अतिशय कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :