Anjali Damania । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, अंजली दमानिया या काल (३ एप्रिल) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) देखील उपस्थित होते. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया यांनी अजून एका प्रकरणाची पोलखोल केली आहे. बीडमधील बोबडे नावाच्या कुटुंबाला एका सावकाराने इतकं छळलं की त्या कुटुंबातील एकाने आत्महत्या केली, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
Anjali Damania reveals another case from Beed
त्या म्हणाल्या, “काल मला बीडवरून एक बोबडे नावाचं अख्खं कुटुंब भेटायला आलं होतं. त्यांची दोन मुलं मंगेश आणि बजरंग यांनी एक राईस मिल चालू करण्यासाठी सावकारांकडून काही लोन घेतलं होतं. परंतु ही राईस मिल चालू झाल्यानंतर कोविड काळात त्यांना लॉस झाला. परंतु त्या सावकारांनी त्यांना इतका छळलं की त्यामधील एक भाऊ घर सोडून निघून गेला आणि दुसऱ्या भावाला इतका त्रास दिला की भाऊबीजेच्या दिवशी त्याने गळफास घेत आत्महत्या केली.”
गळफास घेण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या मृत्युपत्रात सगळ्यांची नावं लिहिली असतानाही कुठल्याही प्रकारची कारवाई त्यावर आजपर्यंत झाली नाही. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडला जाणार असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या :