Share

 संजय राऊतांनी ‘माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन’ म्हणताच Praful Patel म्हणाले…

Sanjay Raut warned Praful Patel. To this, Praful Patel replied in three words.

Praful Patel । वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलत असताना संजय राऊत यांची जीभ घसरली.

Praful Patel Criticized Sanjay Raut 

मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांना इशारा दिला. यावर प्रफुल्ल पटेल यांनी तीन शब्दात उत्तर दिलंय. प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर पोस्ट करत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अंगूर खट्टे है’ म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना डिवचले आहे. आता यावर संजय राऊत काय उत्तर देतात? हे पाहावं लागणार आहे.

संजय राऊतांच वक्तव्य काय?

“प्रफुल्ल पटेल सारखे लोक दलाल आहेत. कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत होते. मग दाऊदची दलाली केली असे वाटते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागला आहे. मी प्रफुल्ल पटेलला सांगतोय, माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन”, अशा तीव्र शब्दात संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांना फटकारलं.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut warned Praful Patel by speaking at a low level. To this, Praful Patel replied in three words.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now