Share

“माझ्या बाबतीतही बीड सारखं घडविण्याचा कट होता, पण…”; Jaykumar Gore यांचा खळबळजनक दावा

Jayakumar Gore has claimed that there was a conspiracy to create a Beed-like situation in my case as well.

Published On: 

Jayakumar Gore has claimed that there was a conspiracy to create a Beed-like situation in my case as well

Jaykumar Gore । बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत बोलताना पाकलमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंढरपूर येथे कार्यक्रमात बोलताना त्यांनी “माझ्या बाबतीतही बीड सारखं घडविण्याचा कट होता”, असं विधान केलं आहे.

ते म्हणाले, “माझ्या बाबतीतही बीड सारखं घडविण्याचा कट होता. पण मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो. अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटात अडकवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते.” यामध्ये अनेक जण सामील असून या सर्वांचे पुरावे देखील त्यांच्याकडे असल्याचा दावा जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केला आहे.

सध्या पोलीस याचा तपास करीत असल्याने मी यावर कोणतेही विधान करणार नसलो, तरी पोलिसांची चौकशी झाल्यावर हे सर्व पुरावे आणि माहिती माध्यमांसमोर आणणार असल्याचा इशारा जयकुमार गोरे इशारा दिला. “मी आमदार होऊ नये, मंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले आणि मंत्री झाल्यावर देखील मला त्रास दिला. खरंच मर्दाची अवलाद असाल तर समोर येऊन लढा”, असं आव्हान षडयंत्र रचणाऱ्या विरोधकांना जयकुमार गोरे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही