Share

अंजली दमानिया, जरांगे आणि Dhananjay Deshmukh यांची एकत्र भेट; काय झाली चर्चा?

Anjali Damania Manoj Jarange and Dhananjay Deshmukh meet together

Dhananjay Deshmukh | बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने (Santosh Deshmukh Murder Case) महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, आज अंजली दमानिया या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, यावेळी तिथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) देखील उपस्थित होते.

Anjali Damania Manoj Jarange and Dhananjay Deshmukh meet together

या भेटीत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर चर्चा झाली का?, असा प्रश्न विचारला असता, याला पुढची दिशा कशी द्यायची यावर चर्चा झाली असल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, “त्या चार्टशीटमध्ये सगळं अर्धवट वाटत आहे. आरोपी सुदर्शन घुलेच स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं. कारण, त्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही याबाबत चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही.”

दरम्यान , मनोज जरांगे यांनीदेखील या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. धनंजय मुंडे हेच कर्तेकर्वीते आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Anjali Damania Manoj Jarange and Dhananjay Deshmukh meet together. Anjali Damania gave information about what was discussed in this meeting.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now