Chandrashekhar Bawankule । वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी (२ एप्रिल) संसदेत मांडण्यात आलं. लोकसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत यावर चर्चा सुरू आहे. मात्र, या विधेयकास काँग्रेससह शिवसेना उबाठा पक्षानेही विरोध केला आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केल्याने भाजपने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray
करे तो करे क्या, अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाली असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. “उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले”, असा मिश्किल टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, विशिष्ट समाजाचा विचार करून त्यांच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते, त्यांचे शिवसैनिक शिवसेना सोडून जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यासंदर्भात मला काल सकाळपासून फोन येत आहेत, असा गौप्यस्फोट देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या :