🕒 1 min read
Uddhav Thackeray । लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. यावेळी शिवसेनेच्या (ठाकरे) खासदारांनी विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यावरून भाजपासह त्यांचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर निशाणा साधत असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. जिनांनाही लाजवेल अशी मुस्लीम समाजाची बाजू घेणारी भाषणं अमित शाहांनी केली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray Criticized Amit Shah
“जिनांनाही लाज वाटली असेल अशी भाषणं करण्यात आली. जिनांनी जे केलं नाही ते भाजपाचे नेते आणि त्यांचे सहकारी पक्ष यांनी करुन दाखवलं. जर ते आम्हाला हिंदुत्व सोडलं म्हणत आहेत तर मग काल भाजपाने काय सोडलं होतं?”, असा खोचक सवाल करत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
“तुम्हाला मुसलमानांचा तिटकारा असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा रंग काढा. तुम्ही लावालावी थांबवा. फटाक्याची वात लावायची आणि पळ काढायचा हे सोडा”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा या ढोंगाला आणि व्यापारी मित्रांना ज्या भूखंड दिल्या आहेत. त्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “मी देवेंद्र फडणवीसांना विचारतो की…”; Uddhav Thackeray यांचा खोचक सवाल
- “अमित शाहांचे सत्य शेवटी बाहेर आले…”; Sanjay Raut असं का म्हणाले?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








