Share

“अमित शाहांचे सत्य शेवटी बाहेर आले…”; Sanjay Raut असं का म्हणाले?

Sanjay Raut criiticized amit shah over waqf amendment bill

Sanjay Raut | वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडली. यावर बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. हे विधेयक मुस्लिम संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे की या विधेयकाचा उद्देश संपत्तीची खरेदी-विक्री करणे हा आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केलेत.

Sanjay Raut Criticized Amit Shah

पुढे ते म्हणाले, “या मोकळ्या जमिनी कोण कोणाला विकणार आणि कशा पद्धतीने विकणार? या देशामध्ये विकणारे दोन आहेत आणि विकत घेणारे देखील दोनच आहेत. दुसऱ्या कोणाला या जमिनी जाणार आहेत का? हा सगळा खटाटोप काय आहे हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडातून बाहेर पडले आहे.” या जमिनी आम्ही विकणार आहोत, असे अमित शहांनी म्हंटल असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.

“कालचा बिलाचा मसुदा आणि कालचे भाषण ऐकले तर त्यामध्ये फक्त संपत्ती, संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळे काहीही नाही. त्यांना स्वप्नात सुद्धा संपत्ती दिसते. खाता-पितांना उठताना त्यांना फक्त जमिनी दिसतात”, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अडीच लाख कोटीच्या वर ज्या प्रॉपर्टीचे मूल्य आहे. अशा प्रॉपर्टीवर आपला अधिकार राहावा यासाठी काल हा खेळ झाला, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी …

पुढे वाचा

Marathi News Maharashtra Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now