“तुम्ही गोधडी ओली करत होतात तेव्हा…”; Nitesh Rane यांची संजय राऊतांवर खालच्या पातळीची टीका

Nitesh Rane | वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची वेळ निश्चित केली आहे. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. वक्फ (सुधारणा) विधेयकाबाबत बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more

Published On: 

Nitesh Rane low-level criticism on Sanjay Raut

Nitesh Rane | वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची वेळ निश्चित केली आहे. या प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. वक्फ (सुधारणा) विधेयकाबाबत बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर तसेच भाजपावर निशाणा साधला.

वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्त्वाचा काहीही संबंध नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. राऊतांच्या या भूमिकेवर बोलताना नितेश राणे यांची जीभ घसरली. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपला हिंदुत्व शिकवायची संजय राजाराम राऊत यांची लायकी नाही, असं म्हणत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटही केलं आहे.

भाजपला “मिशा फुटल्या नव्हत्या” म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही “गोधडी ओली करत होतात” तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत होते, अशा आशयाचं ट्विट राणेंनी केलं आहे. पुढे ते म्हणतात, “आजचा उबाठा गट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणारी आणि वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना झाली आहे. ठाकरे गटानं हिंदुत्वाचा “पीळ” सोडून दिला आहे, आणि आता काँग्रेसच्या अजेंड्यावर हिंदुत्वाशी लबाडी करत आहे. राम आणि कृष्ण आले आणि गेले असं संजय राजाराम राऊत म्हणाले पण आजही हिंदू प्रभू राम आणि श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवून आहे. तुम्ही जनाबी परंपरा पाळायला सुरूवात केल्यामुळे राम आणि कृष्ण तुम्हाला कळणार नाहीत. महाराष्ट्रातील जनता सगळी सत्य परिस्थिती पाहत आहे. संजय राऊत कितीही वटवट केली तरी लोकांना आता मूर्ख बनवता येणार नाही.”

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही