Jitendra Awhad । वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकावरून लोकसभेत मोठा गोंधळ झाला. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची वेळ निश्चित केली असून याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना त्यांनी अंबानीचं घर हे वक्फच्या जमिनीवर असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, “आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे. मग आपण वक्फ बोर्डला विरोध कशाला करायचा? एकदा जमीन वक्फ करण्यात आली, म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली. परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही.”
Jitendra Awhad On Waqf Amendment Bill
“त्याचबरोबर आता कायदा करायचा असेल तर असा करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. त्यांच्या वाड-वडिलांनी वक्फला दान केलेल्या जमिनी आहेत. अंबानीचं घर हे वक्फच्या जमिनीवर आहे”, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला.
“मी मंत्री असताना फाईलवर लिहिलं होतं की जमीन वक्फ झाली की ती विकता येत नाही. माझ्याकडे जमीन हस्तांतरित करण्यासाठी आणि विकण्यासाठी आली होती. मी नकार दिला. वक्फ म्हणजे दान केलेली जमीन ती विकता कशी येईल?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या :