🕒 1 min read
Ajit Pawar । राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) हे आज (२ एप्रिल) बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतीचिन्ह न आणण्याची विनंती त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केली. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने खूप चांगलं चाललं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त हात जोडा काही आणू नका, असंही अजित पवार म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं. तेव्हापासून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज अजित पवारांनी अचानक हे विधान करत शरद पवारांची आठवण काढल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.
Ajit Pawar Statement About Sharad Pawar
ते म्हणाले, “हाराचा बोझा आहे मानगुटीवर. काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं. काही देऊ नका. फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार घ्या. पायाही पडू नका.” त्याचबरोबर आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नसल्याचं अजित पवार म्हणालेत. “आईबापाच्या पाया पडा, गुरूच्या पाया पडा. महापुरुषांच्या पाया पडा. पण उगाचच कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नका. ही लाचारी पत्करल्यासारखं होतं,” असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- जेलमध्येच Walmik Karad सह सुदर्शन घुलेला मारहाण, कोणी केला हल्ला?
- “नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार संघ ठरवेल”; Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा
- “चांगल्या राज्यकर्त्यांचे गुण Raj Thackeray यांच्या कृतीत येत नाहीत”, Anjali Damania यांनी लगावला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








