Deepak Kesarkar | जून 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारी घटना घडली. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं. परिणामी उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.
दरम्यान, पक्षफुटीच्या वेळी नेमकं काय घडलं होतं? हे सांगताना माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महत्वाचं विधान केलं आहे. पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.
Deepak Kesarkar On Waqf Imendment Bill
ते म्हणाले की, “ज्यावेळेला पक्षात मतभेद झाले त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती स्विकारली नाही. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी होतं.” यावेळी बोलताना त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही धर्मात भेदभाव करत नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :