Eknath Shinde । लोकसभेत वक्फ बोर्ड विधेयक संमत झाल्यानंतर आता राज्यसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यावरून भाजपासह त्यांचे मित्रपक्ष हे उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर निशाणा साधत असतानाच आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपासह एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. त्यांच्या टीकांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख एसंशि असा केला होता. यावर “मला एसंशि म्हणाले मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली खरं म्हणजे अब्रू काढून घेण्यासारखंच आहे. वक्फ बोर्ड बिल आणल्याने काही मूठभर लोकांच्या हातात लाखो, करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे, असंही एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
“मला गद्दार, गद्दार म्हटलं, खोके खोके म्हटलं. महाराष्ट्रातल्या जनेतेने तुम्हाला खोक्यांमध्ये बंद करुन टाकलं. १०० पैकी २० च आमदार आले. ते पण आमच्या काही लोकांच्या चुका झाल्याने आले. गद्दार कोण आणि खुद्दार कोण? याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिला आहे”,अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
महत्वाच्या बातम्या :