Walmik Karad । आज सकाळीच बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्यावर गित्ते गँगकडून हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या कारागृहात दोन गटामध्ये तुफान राडा झाला आहे.
यावेळी एका गटाने सुदर्शन घुले याला मारहाण केली आणि वाल्मिक कराडलादेखील कानाखाली लगावल्याची माहिती समोर आली आहे. गित्ते गँगचा सदस्य महादेव गित्ते (Mahadev Gitte) आणि अक्षय आठवलेकडून कराड तसेच घुले नाष्टा करायला बरेकमधून बाहेर पडले असता मारहाण केली.
वाल्मिक कराडवरील हल्ल्यानंतर आता गित्ते गँगचा म्होरक्या शशिकांत अर्थात बबन गित्तेकडून (Baban Gitte) फेसबूक पोस्ट करत थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याने फेसबूकवर आपला एक फोटो पोस्ट करत ‘अंदर मारना या मरना सबकुछ माफ है’ असं म्हटले आहे.
दरम्यान, बबन गित्तेच्या फेसबुक पोस्टनंतर आता बीडमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. बबन गित्ते हा सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागत नाही.
Baban Gitte warns Walmik Karad
त्याचे वाल्मिक कराडसोबत जुनी भांडणे आहेत. अशातच आता तुरुंगात कराडवर हल्ला करणे आणि त्यानंतर फेसबूकवर पोस्ट करत धमकी दिल्याने बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले