Suresh Dhas । आज बीड कारागृहात वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा बीड कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“इतरांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचे आणि फसवणूक करायची अशीच कामे वाल्मिक कराड करायचा. महादेव गित्ते (Mahadev Gitte) याला एका खोट्या गुन्ह्यात अडकवलं आहे. त्याचा एक व्हिडिओ महादेव गित्तेने जेलमध्ये जाण्यापूर्वी तयार केला होता,” असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
“हा वाल्मिक कराड विरुद्ध बबन गित्ते अशा परळीतल्या टोळीयुद्धाचा परिणाम असून कराड आधी म्हणायचा की मी याला संपवल्याशिवाय चप्पल घालणार नाही. तर गित्ते म्हणायचा की कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही,” असे धस म्हणाले.
“संतोष देशमुख प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं नावं गोवली. यावरून ही मारहाण झाली असावी. कारागृहातील सुरक्षा आणि बीड पोलिस यावर चार तासांचा चित्रपट निघू शकतो,” असा टोला सुरेश धस यांनी लगावला.
Suresh Dhas first reaction on Walmik Karad and Sudarshan Ghule beaten up in jail
दरम्यान, मरळवाडीचे सरपंच म्हणून बापू आंधळे हे निवडून आले होते. ते अजित पवार गटात कार्यरत होते. पण त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याप्रकरणात उपाध्यक्ष बबन गिते याच्यासह मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात कराडचा सहभाग नसल्याचे सांगून त्याचे नाव वगळले आहे. उर्वरित आरोपी अटक असून बबन गित्ते अद्याप फरार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :