Udayanraje Bhosale । प्रशांत कोरटकरने (Prashant Koratkar) छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
“सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा (Law on Cinematic Liberty) आणावा, असा कायदा आणण्यासाठी समिती नेमावी. कठोर कायदा करून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा करा तसेच त्यांची नसबंदी करा,” अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.
“विकृत लोकांना कोणतीही जात किंवा पक्ष नसतो. कोणाला कितीही संरक्षण असले तरी एकदा मानसिकता बिघडली की, ‘मेलो तरी चालेल, पण याला खल्लास करणार, याला कोणीही रोखू शकत नाही’ अशी भावना निर्माण होते. अशा प्रकारची वेळ येऊ देऊ नका,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
औरंगजेबवरूनही उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेब काही देव नव्हता, तो इथला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मस्थळ जपण्याचे काम केले. यांनी विरोधात काम केले, मग यांची समाधी कशाला जपायची? तो लुटेरा होता, चोर होता,” अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
Udayanraje Bhosale criticized Prashant Koratkar
दरम्यान, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारकडे याच अधिवेशनात काही मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :