Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh murder case) तपास पोलिसांकडून कसून केला जात आहे. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचेही पोलीस तपासादरम्यान समोर आले आहे. त्याच्यावर सध्या मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाने वाल्मिक कराड आणि त्याची टोळी अडचणीत आली आहे. साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाने संतोष देशमुख यांची हत्या कधी? कुठे? आणि कशी झाली? हे स्पष्ट झाले आहे.
इतकेच नाही तर संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे? याची देखील माहिती गोपनीय साक्षीदारांकडून देण्यात आली आहे. यामुळे कराड आणि त्याची गॅंग अडचणीत आली.
सुरक्षेच्या कारणास्तव या साक्षीदारांची नावे उघड केली नाहीत. अवादा कंपनीतून खंडणी वसूल करणे आणि त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, असे पोलिसांनी तपासात सांगितले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
Witnesses revealed secret about Walmik Karad
अशातच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले आहे. या हत्याप्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला तरी फरार असलेला कृष्णा आंधळे (Krishna Andhale) पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :