Rohit Sharma । रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy 2025) अंतिम फेरी गाठली आहे. येत्या 9 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. अशातच रोहित शर्माने एक विश्वविक्रम (Rohit Sharma Record) केला आहे.
आयसीसी स्पर्धेमध्ये रोहित शर्माने अशी कामगिरी केली आहे, जी आजवर कोणत्याच कर्णधाराला करता आली नाही. फक्त दोन वर्षांच्या कालावधीत रोहित शर्माने ही कामगिरी केली असल्याने त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
रोहित शर्मा आयसीसीच्या सर्व चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर 2023 मध्ये भारतीय संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (ICC World Test Championship) अंतिम फेरी गाठली होती.
पण या स्पर्धेमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा 2023 मध्ये भारतीय संघाने ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (ICC ODI World Cup) अंतिम फेरी गाठली होती. यामध्येही भारतीय संघाला यश आले नाही.
Rohit Sharma World Record
गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup) अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. यावर्षी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ विजेतेपद जिंकणार की नाही? हे येत्या 9 मार्च रोजी समजेल.
Rohit Sharma ODI career
रोहित शर्माने 2007 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 हजार धावा केल्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 31 शतके आणि 57 अर्धशतके आहेत. रोहित एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 हजार धावा करणारा चौथा भारतीय आणि एकूण दहावा फलंदाज ठरला आहे.
Rohit Sharma performance in Ranji matches
रोहित शर्माने आतापर्यंत 128 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9290 धावा केल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 309 आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 24 विकेट्सही घेतल्या आहेत.
Rohit Sharma performance in T20 cricket
टी-20 क्रिकेटमध्ये 4200 धावा करणारा रोहित शर्मा हा आता क्रिकेट विश्वातील पहिलाच खेळाडू आहे. कारण आतापर्यंत क्रिकेट विश्वात इतक्या धावा कोणालाही करता आलेल्या नाहीत.
Rohit Sharma performance in IPL
2008 साली रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. यामध्ये 257 सामन्यांमध्ये एकूण 6628 धावा केल्या आहेत. यंदा तो किती धावा करतो? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Rohit Sharma performance in the World Test Championship
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्मा याने 2,000 धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :