Salman Khan । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा येत्या 28 मार्च रोजी सिकंदर (Sikandar) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये (Sikandar Film Budget) असल्याचे सांगितले जात आहे. साजिद नाडियाडवाला यांनी सिकंदर चित्रपटाचे डिजिटल, सॅटेलाइट आणि संगीत हक्क सुमारे 165 कोटी रुपये (Sikandar film earnings before release) विकले गेले आहेत.
माहितीनुसार सलमान खानच्या करिअरमधील सगळ्यात महागड्या बजेटच्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. त्यामुळे रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट किती रुपयांची कमाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिकंदर हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 60 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान स्वत:च्याच अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सलमान खानच्या सिकंदर या नवीन चित्रपटाचा 1 मिनिट 21 सेकंदांचा टिझर रिलीज झाला होता. या टिझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. काही क्षणात या चित्रपटाच्या टिझरला लाखो व्ह्यूज मिळाले होते.
Salman Khan film Sikandar film first song
या चित्रपटातील पहिले गाणे ‘जोहरा जबीं’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे, जे सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. रिलीजच्या अवघ्या 12 तासांतच गाण्याला 13 लाख व्ह्यूज मिळाले होते. सलमान खानच्या स्वॅगसोबत रश्मिकाची दिलखेचक अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :