Share

अदनान सामीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; मोहन भागवतांच्या भेटीनंतर केला मोठा गौप्यस्फोट!

संघाच्या कार्यक्रमात बॉलीवूड स्टार्सची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. यातच अदनान सामीने मोहन भागवतांबद्दल केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Published On: 

Adnan Sami on RSS: मोहन भागवतांच्या भेटीनंतर अदनान सामीने व्यक्त केल्या भावना!

संघाच्या व्यासपीठावर बॉलीवूडची मांदियाळी दिसेल आणि त्यातही अदनान सामीसारखा (Adnan Sami) गायक चक्क आरएसएसचं कौतुक करेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल, पण हे खरंच घडलंय! मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात जे काही घडलं, त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

या दोन दिवसीय कार्यक्रमात सलमान खानपासून ते रणबीर कपूरपर्यंत अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. पण, खरी खळबळ उडाली ती पाकिस्तान सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारणाऱ्या अदनान सामीच्या एका पोस्टमुळे. या कार्यक्रमात अदनान सामीने सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली आणि त्यांचं भाषण ऐकलं. त्यानंतर इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Adnan Sami on RSS

अदनान सामीने लिहिलंय, “आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला. त्यांचं भाषण मला प्रचंड आवडलं. त्यांनी अनेक गैरसमज दूर केले आणि मिथकांबद्दलही खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. ते अत्यंत अविश्वसनीय सज्जन आणि सुंदर व्यक्ती आहेत.” अदनानच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टी, रुपाली गांगुली आणि रमेश तौरानी हे देखील दिसत आहेत.

फक्त अदनानच नाही, तर निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनेही मोहन भागवतांच्या भाषणाचं कौतुक केलंय. “त्यांचे शब्द फक्त प्रेरणादायीच नाहीत, तर त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धीही आहे,” असं म्हणत करणने संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात विकी कौशल ‘लव्ह अँड वॉर’ लूक मध्ये, तर अनन्या पांडे पारंपरिक अंदाजात दिसली.

एकीकडे सेलिब्रिटींची गर्दी असताना, मोहन भागवतांनी आपल्या भाषणात चक्क सलमान खानचं उदाहरण दिलं. तरुणाईमध्ये फॅशन कशी रुजते, हे सांगताना ते म्हणाले, “कॉलेजचे विद्यार्थी सेलिब्रिटींसारखे कपडे घालतात, कारण त्यांना ती फॅशन वाटते. जे लोक फॅशन तयार करतात, त्यांना समाजात आदराचं स्थान असतं.”

एरवी राजकीय कारणांमुळे चर्चेत राहणारा संघ आता बॉलीवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood Celebs) उपस्थितीमुळे आणि अदनान सामीच्या ‘त्या’ विधानामुळे लाईमलाईटमध्ये आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही