Share

‘पाकिस्तानी सैनिकाच्या मुलासोबत चहापान, बाजूला ती नटी’; संजय राऊतांचा मोहन भागवतांवर हल्लाबोल

“पाकिस्तानी एअरफोर्सच्या अधिकाऱ्याचा मुलगा आणि अडल्ट फिल्मवाल्याची बायको संघाच्या मंचावर कशी?” संजय राऊतांनी मोहन भागवतांवर डागली तोफ. वाचा सविस्तर.

Published On: 

Sanjay Raut on RSS: पाकिस्तानी गायकावरून राऊत भडकले; म्हणाले, 'हीच का तुमची प्रेरणा?'

कट्टर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादाचे धडे देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) व्यासपीठावर नेमकं कोण हवं आणि कोण नको, यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. संघाच्या कार्यक्रमात दिसलेल्या काही चेहऱ्यांवरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर सडकून टीका केली आहे. “ज्यांनी भारतावर बॉम्ब टाकले, त्यांच्या मुलासोबत सरसंघचालक नाश्ता करतात का?” असा जळजळीत सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘नवे क्षितीज’ कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावर बोलताना राऊत म्हणाले, “आम्हाला संघाविषयी आदर आहे, पण काल जे चित्र दिसलं ते धक्कादायक होतं. गायकाचा बुरखा पांघरलेला अदनान सामी (Adnan Sami) सरसंघचालकांच्या मांडीला मांडी लावून बसला होता. हा तोच अदनान आहे, ज्याचे वडील पाकिस्तान एअरफोर्समध्ये होते आणि ज्यांनी 1965 च्या युध्दात भारताच्या पठाणकोट तळावर बॉम्बफेक केली होती. अशा व्यक्तीच्या मुलासोबत चहापान करताना संघाला काहीच वाटलं नाही का?”

Sanjay Raut on RSS

केवळ अदनान सामीच नाही, तर एका अभिनेत्रीचा उल्लेख करत संजय राऊत यांनी (Sanjay Raut Criticises RSS) नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “एक नटी बाजूला बसली होती, जी म्हणते ‘आय लव्ह भागवत’, जिच्या नवऱ्यावर अडल्ट फिल्म बनवण्याचा गुन्हा दाखल आहे, जिच्यावर आर्थिक गैरव्यवहाराची लूकआऊट नोटीस आहे, ती व्यक्ती तुम्हाला चालते? हीच का तुमची प्रेरणा?”

राऊतांनी यावेळी जावेद अख्तर आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण करून दिली. “जावेद अख्तरांचे काका सावरकरांसोबत काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते आणि शाहरुखचे आजोबा नेताजींच्या सैन्यात होते. पण त्यांना तुम्ही बोलावले नाही, कारण तुमच्या लेखी ते देशद्रोही आणि पाकिस्तानी सैनिकांची मुले देशभक्त ठरली आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला. राऊतांच्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही