Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यात आरोपींविरोधात संतापाची तीव्र लाट पसरली आहे.
अशातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “आम्ही या प्रकरणात अजून काही पुरावे सादर करणार आहे. त्यानंतर अजून बरेच चेहेरे आरोपी म्हणून समोर येणार असून कृष्णा आंधळे (Krishana Andhale) सापडल्यानंतर बरेच खुलासे होतील,” असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.
“जरी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हटले असले की, सीआयडीला कुठला पुरावा असता तर अजून आरोपी या प्रकरणात सापडले असते. पण तपास संपला नाही, सप्लीमेंट्री चार्ज दाखल होणे बाकी आहे,” असा खुलासा धनंजय देशमुख यांनी केला आहे.
“या हत्याप्रकरणाला 3 महीने पूर्ण होत आले असून अजूनही न्यायाची लढाई संपली नाही. आता न्यायाचा दूसरा भाग सुरू झाला आहे. जे लोक गुन्हा करून स्वत:ला निर्दोष समजत आहेत, त्यांना आम्ही आता समोर आणण्यासाठी लढा देणार आहे,” असा इशारा देखील धनंजय देशमुख यांनी यावेळी दिला आहे.
Dhananjay Deshmukh statement about Dhananjay Munde
तसेच धनंजय देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही भाष्य केले. “या हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा मुंडेंच्या जवळचा होता हे आम्ही त्यांना कागदोपत्री दाखवून काय केले पाहिजे हे विचारतो. धनंजय मुंडे विरोधात पुरावे असते तर तपासात आले असते,” असेही देशमुख म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :