Share

“मराठी जनता दुधखुळी…”; भैय्याजी जोशींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर Raj Thackeray यांचा निशाणा

Bhaiyyaji Joshi statement that it is not necessary to learn Marathi has been taken seriously by Raj Thackeray.

by MHD

Published On: 

Raj Thackeray criticize Bhaiyyaji Joshi

🕒 1 min read

Raj Thackeray । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मराठी शिकणे गरजेची नाही असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर आणि भाजपवर (BJP) राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भैय्याजी जोशी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray criticize Bhaiyyaji Joshi on X

राज ठाकरे X वर लिहितात,”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही,” अशा शब्दात ठाकरेंनी कान टोचले.

“पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का?,” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

“उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का?,” असाही घणाघात राज ठाकरे यांनी केला.

“सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव?,” असा संतप्त सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

Raj Thackeray on Bhaiyyaji Joshi

“आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला, त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं,” असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!