Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो समोर येताच आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तरीही त्यांच्यावर अजूनही टीका केली जात आहे. यामुळे राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच तापले आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत असतात. अशातच आता पुन्हा एकदा धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला आहे. “अजूनही धनंजय मुंडे आरोपींना पाठिशी घालत आहते. वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,” असा आरोप धस यांनी केला आहे.
तसेच सुरेश धस यांनी सतीश भोसले (Satish Bhosale) याच्याबद्दलही वक्तव्य केले आहे. “हा व्हायरल होणारा व्हिडीओ आताचा नाही तर दीड वर्षे जुना असून तो माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करा,” अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
“याबाबत समोरच्या व्यक्तीन फिर्याद द्यावी. अजूनही मी या घटनेचे समर्थन केले नाही. समजा तो असं काही म्हटला असेल तर त्याची मी भेट घेईन. सतिश भोसले कधीतरी माझ्याकडे येतो. पण तो पाठीमागे काय उद्योग करतो हे मला थोडी माहिती आहे,” असे धस म्हणाले.
Suresh Dhas on Satish Bhosale
“आमच्या येथे ऊसतोड कामगार खूप आहेत. ही घटना मुलीच्या छेडछाडीवरुन कोणत्या तरी एका कारखान्यात घडली आहे. या घटनेची कुठेही केस झाली नाही. जरी माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याबाबतीत काही तक्रार आली तर ती नोंद करा,” असे आदेश सुरेश धस यांनी पोलिसांना दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :