Share

Walmik Karad कडे असणारी संपत्ती कोणाची? Manoj Jarange Patil यांनी थेट नावच घेतले

Manoj Jarange Patil has made a big disclosure about the wealth of Walmik Karad. This has given rise to various discussions.

by MHD

Published On: 

Manoj Jarange Patil criticizes Dhananjay Munde over Walmik Karad Property

🕒 1 min read

Manoj Jarange Patil । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ पाहून संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) हे फोटो समोर येताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

परंतु, आज त्यांच्यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे. “आमदारकीपासून धनंजय मुंडे यांना हटवले पाहिजे. कारण मुंडे मंत्री असताना वाल्मिक कराड हाच त्यांची संपूर्ण कामे पाहत होता,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

“संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडकडे (Walmik Karad) असणारी संपत्ती ही त्याची नाही. कराडची सगळी संपत्ती माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची आहे,” असाही दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

“धनंजय मुंडे यांची पूर्ण जातीयवादी टोळी जेलमध्ये गेल्याशिवाय मी शांत बसणार नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहिलयानंतर जनतेचे मन त्यांच्याविषयी बदललेलं आहे. मराठा समाजाने त्यांना जवळ करू नये,” असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil target Dhananjay Munde

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद आणखी चिघळू शकतो. यावर आता धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या