Share

मनोज जरांगेंची पुण्यात ‘डॅशिंग’ एंट्री; थेट CMO ला फोन अन् मोठा इशारा, “मला आंदोलनाला…”

Maratha activist Manoj Jarange Patil joins MPSC students protest in Pune demanding age limit relaxation for PSI recruitment, warns state government directly.

Published On: 

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis over Nagpur violence

🕒 1 min read

पुणे – सरकारला धारेवर धरणं मनोज जरांगे पाटलांना नवीन नाही, पण आज पुण्यात जे घडलं, त्याने प्रशासन पुन्हा एकदा हादरलंय. “मी एकदा आंदोलनाला बसलो की प्रश्न सुटतोच,” हा त्यांचा ( Manoj Jarange ) जुना डायलॉग आज पुन्हा एकदा पुण्याच्या रस्त्यावर घुमला आणि हजारो विद्यार्थ्यांच्या काळजात आशेचा किरण जागा झाला.

झालं असं की, पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आली आहे. ही वयोमर्यादा एक वर्षाने वाढवून मिळावी, या मागणीसाठी पुण्याच्या डेक्कन भागात, भिडे पुलाखाली हजारो विद्यार्थी एकवटले आहेत. वातावरण तापलेलं असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तिथे एन्ट्री झाली आणि मग जे घडलं, ते पाहण्यासारखं होतं.

Manoj Jarange Patil joins MPSC students protest in Pune

जरांगे पाटील फक्त आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले नाहीत, तर त्यांनी जागेवरूनच थेट मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) ओएसडीला फोन फिरवला. इतकंच नाही, तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. त्यांचा पवित्रा एकदम आक्रमक होता. “विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा, नाहीतर मला आंदोलनाला बसू देऊ नका. प्रश्न सुटला नाही तर लक्षात ठेवा, महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत,” असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितलंय की, “जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत मी या जागेवरून हलणार नाही.” त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आता या आंदोलनाला मोठं बळ मिळालं आहे. जरांगे पाटील ( Manoj Jarange ) मैदानात उतरल्यामुळे आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार यावर काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही