Bobby Deol । आश्रम (Aashram) या वेबसीरिजनंतर अभिनेता बॉबी देओल चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्यादेखील कमालीची वाढली आहे. नुकताच आश्रम सीरिजचा सीझन 3 पार्ट 2 (Aashram series season 3 part 2) प्रदर्शित झाला आहे. परंतु, एका मुलाखतीदरम्यान बॉबी देओलने एक खळबळजनक खुलासा केला आहे.
“आश्रम या सीरिजचे प्रमोशन करत असताना मला व्हर्टिगो अटॅक आला. कारण मला व्हर्टिगोचा त्रास असून अशी भूमिका बजावल्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया असेल. याची मला सतत भीती वाटत होती. अटॅक आला तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधार आला होता,” असे बॉबी देओल एका मुलाखतीदरम्यान म्हणाला.
“कोणताही चित्रपट तयार झाला की त्यावेळी कलाकार हे त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पाहतात. पण इथे असे झाले नाही. ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली आणि त्यावेळी मी सर्व एपिसोड पाहिले. त्यावेळी माझा फोन वाजत होता, मला अनेक मेसेज येत होते,” असे बॉबी देओल म्हणाला.
पुढे तो म्हणाला की, “माझ्या आई-वडिलांना सीरिजमधील भूमिकेविषयी काही माहित नव्हते. त्यांना सीरिज पाहून खूप आश्चर्य झाले होते. अजूनही तिचे मित्रमैत्रिण फोन करून विचारतात की याचा पुढचा सीझन कधी येणार आहे,” अशी माहिती बॉबी देओल याने दिली.
What is a Vertigo Attack?
व्हर्टिगो अटॅक हा कानाच्या आतील समस्यांमुळे होतो. या आजाराच्या त्रासामुळे अचानक असह्य संवेदना होऊ लागतात. चक्कर येणे किंवा अचानक डोक गरगरु लागणे अशीदेखील लक्षणे दिसू लागतात. भारतात या आजाराचे प्रमाण जवळपास 0.71 टक्के आहे.
Treatment for Vertigo Attack
जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सुधारणा केल्यास आणि वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु केले तर या आजारावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता.
Bobby Deol Upcoming Movies
बॉबी देओलच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच ‘हाउसफुल 5’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हरी हरा मल्लू’ सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमांमध्ये तो कोणती भूमिका पार पडणार आहे? हे लवकरच पाहायला मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :