🕒 1 min read
मुंबई । राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. महिलेने दावा केला आहे की, जयकुमार गोरे यांनी तिला नग्न अवस्थेतील फोटो पाठवले होते. हे प्रकरण 2019 मध्ये न्यायालयात निकाली निघाले असले, तरी मंत्री झाल्यानंतर गोरे पुन्हा त्रास देत असल्याचा आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणावर जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, “माझ्यावर 2017 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. दोन वर्षे खटला चालल्यानंतर 2019 मध्ये न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने माझा मोबाईल आणि इतर पुरावे तपासून निकाल दिला होता. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असते, त्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा होणे चुकीचे आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या वडिलांचं सात दिवसांपूर्वी निधन झालं. मी अस्थीविसर्जनही करू शकलो नाही, कारण विरोधकांनी मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण होईल, याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, अशा गोष्टी राजकारणात घडतात.”
Jaykumar Gore यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा
जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांनी पुढे स्पष्ट केले की, “माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. त्यामुळे मी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. तसेच, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. तसेच, त्यांनी सांगितले की, “जर मी महिलेचा छळ केला असेल, तर पोलिसांनी तपास करावा. तपासात कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी.”
2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांना निर्दोष मुक्त केले होते. न्यायालयाने यासंदर्भातील सर्व नोंदी हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाने दिली आहे. मात्र, आता विरोधकांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जयकुमार गोरे ( Jaykumar Gore ) यांनी या आरोपांवर आक्रमक भूमिका घेतली असून, विरोधकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. हा मुद्दा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो, कारण यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray एकनाथ शिंदेंवर आक्रमक; अबू आझमी व निलम गोऱ्हे यांच्या निलंबनाची मागणी
- घटस्फोटाच्या चर्चा अन् तिकडे Aishwarya Rai and Abhishek Bachchan ट्विनिंग लुकमध्ये लग्नाला हजेरी
- Neelam Gorhe यांचं विधान परिषदेचं उपसभापतीपद धोक्यात? जाणून घ्या नेमकं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now